Purnabramha
Latest Reviews
-
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मिळालेले स्वागत आणि पाहुणचार. जागा जास्त मोठी नाही पण सुटसुटीत आणि मोकळी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय बैठकीला दिलेलं प…
About
Purnabramha is open for Casual Dining. Purnabramha serves Maharashtrian dishes. Incorrect or missing information? Make a report, or claim the restaurant if you own it!Details
Feature List
home deliveryindoor seatingReviews
Leave a Review
You must be logged in to post a comment.
1 Reviews on “Purnabramha”
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मिळालेले स्वागत आणि पाहुणचार. जागा जास्त मोठी नाही पण सुटसुटीत आणि मोकळी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय बैठकीला दिलेलं प्राधान्य. तीनही दिशांनी येणारा उजेड अजून प्रसन्न करून टाकतो.ह्या हाॅटेलचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना दिलेलं महत्व. हाॅटेल मालकापासून ते आचार्यांपर्यंत जवळपास सर्वच महिला आहेत. त्यांच्यातला आत्मविश्वास लगेच लक्षात येतो.ह्याच हाॅटेल मध्ये मस्त मराठी संगीत कायम ऐकायला मिळेल.एक खास बाब अशी की, जर तुम्ही तुमच्या वाढदिवसा दिवशी इथे गेलात तर पारंपारिक मराठी पद्धतीने औक्षण केले जाते.आता जेवणाविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील पारंपारिक पद्धतीने बनवलेला पदार्थ खायला मिळतात. कोणत्याही पदार्थात सोडा वापरला जात नाही, त्यामुळे कसलाही त्रास होत नाही.१. पुडाची वडी: खोबरे, कोथिंबीर, लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे वाटण आणि बेसनाच्या वड्या बनवून तळल्या जातात.२. मुगाच्या डाळीचे मुटके: भिजवलेली मुगाची डाळ, हिरवी मिरची, मीठ असे सगळे वाटून त्याच्या गोल वड्या करून उकडून घेतले जातात.३. पुरणांकत थाळी: आई जसे घरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवते, तसेच वाढलेली थाळी समोर आली. पुरणपोळी, कटाची आमटी, दुध, तुप, भात, मिरची भजी, लोणचे आणि मेतकूट. असा राजेशाही थाट होता.४. मासवडी रस्सा: बर्याच ठिकाणी मासवडी बनवताना बेसन न भाजता वापरले जाते. पण इथे बेसन मस्त भाजुन वड्या बनवल्या जातात.५. उकडीचे मोदक: योग्य प्रमाणात गोड, गरमागरम मोदक आणि त्यावर चमचा भरून तुप.दर वेळेस आपण पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन जेवण जेवतोच. पण महाराष्ट्रातील जेवण खुप कमी वेळा बाहेर जाऊन खातो.पण तुम्ही एकदा इथे जेवलात तर परत परत जायची इच्छा तुम्हाला होतंच रहाणार ह्यात शंका नाही.एकदा तरी नक्की चाखून पहावी अशी चव.Thank you